मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत

रॅट्झेल मानवी भूगोलाचा जनक मानला जातो .

प्राकृतिक भूगोलात अत्यंत मोठ्या प्रमाणात अभ्यास व संशोधन चालू आहे. कारण ही भूगोल शाखा प्रथम उदयाला आलेली आहे. त्या मानाने मानवी भूगोलाचा पाहिजे तेवढा अभ्यास व संशोधन झालेले नाही; कारण मानवी भूगोल ही अलीकडच्या काळात उदयाला आलेली शाखा आहे..

एकोणिसाव्या शतकात खऱ्या अर्थाने मानवी भूगोलाच्या विकासास सुरुवात झाली. फेड्रीक रॅट्झेल यांनी १८८२ मध्ये ‘Anthropo-Geography’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात मानवी भूगोलाच्या अभ्यासांचा समावेश आहे. रॅट्झेल मानवी भूगोलाचा जनक मानला जातो. मानवी भूगोल शास्त्रज्ञांनी या भूगोलाच्या ज्ञानात महत्त्वपूर्ण भर टाकली. विडाल – डी – ला-ब्लाश ‘Principles Geographic Hymaine ‘ हा ग्रंथ व १९१० मध्ये ब्रहस् यांनी ‘Geographic Humain’ हा ग्रंथ लिहून मानवी समाजावर होणाऱ्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक परिणामांचे विश्लेषण केले. वरील विचारवंतांबरोबरच हटिंग्टन व कु. सेम्पल यांनी मानवी भूगोलाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाची भर घातली आहे.

मानवी भूगोलात नैसर्गिक परिस्थिती व मानव यांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. मानवी भूगोलात मानव व निसर्ग यांच्या संबंधांचा अभ्यास केला जातो. मानवी जीवनात असणारी विविधता आणि तिची भौगोलिक कारणमीमांसा यांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो.

मानवी भूगोलाची व्याख्या ( Defination of the Human Geography) मानवी भूगोलाची व्याख्या करताना त्यातील विविध दृष्टिकोन लक्षात घेतले पाहिजेत. वेगवेगळ्या मानवी भूगोलवेत्त्यांनी आपल्या दृष्टिकोनातून या विषयाचा आशय व व्याख्या व्यक्त केलेली आहे. या सर्व व्याख्यांच्या अभ्यासानंतर एक मध्यवर्ती संकल्पना तयार होते ती अशी- ‘मानव व निसर्ग संबंधांचा मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे मानवी भूगोल.’ मानवी भूगोलाच्या निरनिराळ्या तज्ज्ञांनी मांडलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे

फेड्रीक रॅट्झेल “मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. ‘

रॅट्झेल हा मानवी भूगोलाचा जनक, जर्मन भूगोलवेत्ता होता. निसर्गवादी असल्यामुळे त्याने मानव व निसर्ग यांच्या अतुट संबंधांच्या अभ्यासास महत्त्व दिले.